Video: Vinesh Phogat चं स्वागत करताना कुस्तीपटू Bajrang Puniya यांच्याकडून तिरंग्याचा अपमान, नेटकरी संतापले (Watch Video)

नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज विनेश फोगटचे स्वागत करण्यात आले. स्वागाताचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एका व्हिडिओमुळे भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया चर्चेत आले आहे.

bajrang punia spotted standing on tiranga Photo credit

Video: नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज विनेश फोगटचे स्वागत करण्यात आले. स्वागाताचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एका व्हिडिओमुळे भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया चर्चेत आले आहे. बजरंग पुनिया हे कारवर लावलेल्या एका तिरंगावर उभे राहिले आहे. त्यामुळे आता ते नेटकऱ्यांच्या चव्हाट्यात सापडले आहे. (हेही वाचा- Vinesh Phogat चं Delhi IGI Airport वर जंगी स्वागत; कुस्तीपटूला अश्रू अनावर (Watch Video)

मिळालेल्या माहितीनुसार, पॅरिस ऑलिम्पिकमधून दिल्ली विमानतळावर विनेश फोगट यांचे आगमन झाले. त्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी अनेक चाहते, कुटुंब सदस्य विमानतळावर आले होते. १०० गॅम वाढल्यामुळे विनेश फोगट यांना पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर काढण्यात आले होते. कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्सने सुवर्ण पदकाच्या सामन्यातून अपात्र ठरल्यानंतर रौप्य पदकासाठी त्यांचे अपिल फेटाळले होते.

विनशे फोगटचे सहकारी भारतीय कुस्तीपटू साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया हे या प्रसंगी उपस्थित होते. त्यावेळीस बजरंग यांनी कारच्या  बोनटवर लावलेल्या तिरंगाच्या स्टिकरवर पाय ठेवला, अश्या पध्दतीने त्यांना भारतीय झेंड्याचा अपमान केल्याने भारतीचे मन दुखावले गेले आहे. त्यामुळे ते अडचणीत सापडले आहे.

घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तिरंग्याच्या पोस्टवर उभे राहून भारतीय ध्वजाचा अनादर केल्याबद्दल भारतीय कुस्तीपटूला नेटकऱ्यांनी चांगलेच फटकारले आहे. कारच्या बोनटवर उभे राहून त्यांनी मीडिया आणि गर्दी सांभाळण्याचा प्रयत्न केला परंतू अश्या स्थितीत त्यांनी तिरंग्याचा अपमान केला. त्यामुळे चाहते देखील भडकले आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement